ग्रामपंचायत मांडवे मध्ये आपले स्वागत आहे

सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात मांडवे हे गाव महादेव डोंगररांगांच्या पायथ्याला वसलेले आहे. गावात असलेल्या नैसर्गिक सौंदर्य व विपुल पाणीसाठा यामुळे गावाला जिल्ह्यामध्ये विशेष महत्व प्राप्त झाले आहे. मांडवे गावाची सर्वसामान्य माहिती खालीलप्रमाणे आहे.

जिल्हा सोलापूर

तालुका माळशिरस

प्रमुख वाड्या वस्त्या लक्ष्मीनगर, भाग्यश्री नगर, बंदुकेवस्ती, शेंडगेवस्ती, करलवस्ती,साळुंखेवस्ती, शिंदेपट्टी,भोंडवेवस्ती गायकवाडवस्ती. नलगाईवस्ती, सुळवस्ती,दुधाळवस्ती, लोहारवस्ती, खुडेवस्ती, पाटीलमळा

लोकसंख्या ( २००१ ) ६६२९

लोकसंख्या ( २०११ ) ७८८३

लोकसंख्या ( २०१५) ८४७६

गावाचे एकूण क्षेत्रफळ ३०८७ हेक्टर

शेतीखालील क्षेत्रफळ २६८५

निवासी वापराखालील क्षेत्रफळ

प्रमुख व्यवसाय शेती, दुग्धव्यवसाय,नोकरी, उद्योगधंदे इ.

्रादेशिक वाहतूक व दळणवळण

मांडवे हे गाव सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात वसलेले आहे. हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या मुख्य ठिकाणाहून १३८ किमी. अंतरावर पश्चिमेस आहे. मांडवे हे गाव पुणे – पंढरपूर राष्ट्रीय महामार्गालगत असून संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मार्गावरील प्रमुख विसावा केंद्र आहे. माळशिरस, अकलूज, बारामती, फलटण दहिवडी व म्हसवड ही मांडवे जवळील काही प्रमुख गावे / शहरे आहेत. बारामती (४५ किमी ) व पंढरपूर (६५ किमी) ही नजीकची रेल्वे स्टेशन आहेत. विमान सेवेसाठी पुणे (१४९ किमी) व सोलापूर (१३८ किमी) या विमानतळावर अवलंबून राहावे लागते.

लोकसंख्येचा तपशील. सन २००१ च्या जनगणनेनुसार मांडवे गावची लोकसंख्या ६६२९ होती, तर २०११ च्या जनगणनेनुसा ७८८३ झाली.तर सन २०१५ साली ८४७६ एवढी झाली. ही लोकसंख्येतील वाढ गावातील वाड्यावस्त्यांचा विस्तार, गावातील मुबलक पाणीसाठा आणि कुशल व मुबलक रोजगार निर्मिती झाली असावी असा अंदाज वर्तविला जात आहे. मांडवे गावची लोकसंख्या (२०११) एकूण लोकसंख्या (२०११) ७८८३ पुरुष लोकसंख्या ४१२२ स्त्री लोकसंख्या ३७६१ स्त्री / पुरुष प्रमाण ९१२ गेल्या दशकात गावच्या लोकसंख्या वाढीचा दर घटला आहे. २००१ ते २०११ या दरम्यान गावची लोकसंख्या ६६२९ वरुन ७८८३ इतकी म्हणजे १९ % वाढली असली तरी वाढीचा हा दर १९९१ ते २००१ दरम्यान ३५ % दरपेक्षा खूपच कमी आहे. जनगणनेनुसार गावात एकूण १५१९ घरे असून कुटुंबातील सरासरी सदस्य संख्या ५.१८ इतकी आहे. तक्ता क्र. 3 भविष्यातील गावाच्या लोकसंख्येचा अनुमान 1वर्ष १९९१ २००१ २०११ २०२१ २०३१ २०४१ लोकसंख्या ४९१९ ६६२९ ७८८३ ९२१७ १०६९९ १२१८१

img

माझेगाव चे रोजगार निर्मितीचे पुढचे पाउल

माजिक व मुलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धलता, दारिद्रय निमुर्लन केंद्रीभूत मानून सामजिक, आर्थिक व राजकीय स

img

माझेगाव चे रोजगार निर्मितीचे पुढचे पाउल

माजिक व मुलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धलता, दारिद्रय निमुर्लन केंद्रीभूत मानून सामजिक, आर्थिक व राजकीय स

img

माझेगाव चा शेती विकास

माजिक व मुलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धलता, दारिद्रय निमुर्लन केंद्रीभूत मानून सामजिक, आर्थिक व राजकीय स

img

EXPERT IN CONSULTING

माजिक व मुलभूत सार्वजनिक सुविधांची यथार्थ उपलब्धलता, दारिद्रय निमुर्लन केंद्रीभूत मानून सामजिक, आर्थिक व राजकीय स